शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे.
चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून शाहरुख खान अगदी भारावून गेला आहे. त्याने नुकतंच ट्वीटरद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला.
‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
शाहरुख खानला यावेळी एका चाहत्याने '‘पठाण’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून तुला कसं वाटतं?' असा प्रश्न विचारला.
यावर शाहरुखने भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला, 'आता पुन्हा गावी जावं असं वाटतं.' शाहरुखने दिलेली ही प्रतिक्रिया आता चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
शाहरुख खानच्या 'पठाण'ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.
चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतात 34. 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने भारतात अवघ्या तीन दिवसांत एकूण 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
पठाण चित्रपट शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये आणि 2500 पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे.