भाभीजी घर पर है मधील अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tondon) ही आपल्या फॅशनमुळे सर्वाचचं लक्ष वेधून घेते. पाहा सौंम्याचे सुंदर फोटो.
सौम्याने मालिका सोडली असली तरीही तिची मालिकेतील अनिता भाभी म्हणून ओळख पुसलेली नाही.
मालिकेत तिच पात्र विशेष लोकप्रिय ठरलं होतं. तिला गोरी मेम असही म्हटलं जायचं.
सौम्या आई झाल्यानंतर तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
सौम्याच्या जागी आता अभिनेत्री नेहा पेंडसे अनिता भाभी हे पात्र साकारत आहे.
सौम्या सोशल मीडियावर फार सक्रीय असते. तिच्या फोटोंनी ती साऱ्यांचचं लक्ष वेधते.
नुकतीच सौम्या लस प्रकरणामुळे चर्चेत आली होती.
पण लस घेण्यासाठी आपण कोणतीही फसवेगीरी केली नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
तसेच या प्रकरणात विनाकारण ओवलं जात असल्याचही ती म्हणाली, व यावर तिने संतापही व्यक्त केला होता.
सौम्या ब्लेझर ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.