NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Satyaprem Ki Katha: रिलीजपूर्वीच वादात अडकला कार्तिक-कियाराचा 'सत्य प्रेम की कथा'; 'या' कारणामुळे होतोय विरोध

Satyaprem Ki Katha: रिलीजपूर्वीच वादात अडकला कार्तिक-कियाराचा 'सत्य प्रेम की कथा'; 'या' कारणामुळे होतोय विरोध

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच तो वादात सापडला आहे. चित्रपटातील एका गाण्यावरून हा वाद सुरू आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

18

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट रिलीज होण्याआधीच तो वादात सापडला आहे.

28

कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याला कारण आहे 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटातील 'पसुरी'.

38

चित्रपटाचं हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर या गाण्याला जोरदार विरोध होत आहे. 'पसुरी'च्या रिमिक्सवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.

48

हे गाणे कोक स्टुडिओ पाकिस्तानच्या 'पसूरी' या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. मुळात 'पसूरी' गाणे अली सेठी आणि शाये गिल यांनी गायले आहे.

58

मूळ पंजाबी भाषेत असलेलं हे गाणं भारतात देखील खूप लोकप्रिय झालं होतं. पण आता या गाण्याचं हिंदी रिमिक्स व्हर्जन ऐकून नेटकरी संतापले आहेत.

68

'सत्य प्रेम की कथा' 29 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

78

या चित्रपटातील इतर गाणी देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकलेले नाहीत.

88

अशा परिस्थितीत आता 'पसूरी' या गाण्याला विरोध झाल्याने चित्रपटाच्या कमाईवर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल.

  • FIRST PUBLISHED :