सारा अली खान सध्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. तिचा नुकताच आलेला जरा हटके जरा बचके हा चित्रपट हिट झाला आहे.
चित्रपट हिट होताच आता ती इंदोरच्या प्रसिद्ध गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहचली आहे.
या ठिकाणी साराने भक्तिभावाने गणपतीची पूजा देखील केली.
साराचे हे फोटो सध्या समोर आले आहेत.
या ठिकाणी साराच्या साधेपणानं चाहत्यांचा मन जिंकलं आहे.
मंदिरात साराने शुभ्र पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. यामध्येच तिने दर्शन घेतलं.
सारा नेहमीच धार्मिक स्थळांना भेट देत असते. ती सोशल मीडियावर या ठिकाणचे फोटो देखील शेअर करते.
आता पुन्हा इंदोरच्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेत साराने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.