संस्कृती बालगुडे ही अभिनेत्री सध्या चर्चेत असते.
ही अभिनेत्री थेट तुळजापूरला जाऊन पोहोचली असल्याचं तिच्या नव्या फोटो वरून समजत आहे.
तसंच तिने तुळजाभवानीचं दर्शन सुद्धा घेतल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
अस्सल मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधून संस्कृतीने मराठी संस्कार दाखवून दिल्याचं पाहायला मिळत आहे.
या सगळ्या फोटोना कॅप्शन देत ती लिहिते, “फेटाााा..!!! तो ही “तुळजापूर” चा…✨”
तिच्या या झकास फोटोंवर खूप सारं प्रेम मिळताना दिसत आहे.
संस्कृती नेहमीच अशा सुंदर लुकमध्ये वेगवेगळे फोटो काढताना दिसते.
तिच्या प्रत्येक लुकवर चाहते भरपूर कमेंट करून आपलं प्रेम दाखवत असतात.