साऊथ सुंदरी अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे.
लवकरच तिचा शाकुंतलम हा सिनेमा येऊ घातला आहे. प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
नुकतंच तिनं पलानी मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. पलानी मंदिरात जाण्यासाठी 600 पायऱ्या चढाव्या लागतात.
आजारपणातही समांथानं अनवाणी पायानं 600 पायऱ्या चढल्या. पायऱ्या चढताना प्रत्येक पायरीवर तिनं जळता कापूरही ठेवला.
पलानी मंदिर हे तमिळनाडू येथे आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या समांथाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
समांथा सध्या मायोसाइटिस नावाच्या आजारावर उपचार घेत आहे. तिनं ट्रिटमेंट सुरू असताना सिनेमाचं डबिंग देखील केलं.