NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / भाईजानचा शेरा ते दीपिकाचा जलाल; 'हे' बॉलीवूड सेलेब्स बॉडीगार्डला देतात इतका पगार

भाईजानचा शेरा ते दीपिकाचा जलाल; 'हे' बॉलीवूड सेलेब्स बॉडीगार्डला देतात इतका पगार

बॉलिवूड सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रियता तर आहेच. पण त्यांच्यासोबतच त्यांचं संरक्षण करणारे बॉडीगार्ड्स देखील तितकेच महत्वाचे असतात. जे बॉडीगार्ड बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत नेहमी त्यांच्या संरक्षणार्थ उभे असतात त्यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहितीये का. चला आज जाणून घेऊया.

18

बॉलिवूड सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रियता तर आहेच. पण त्यांच्यासोबतच त्यांचं संरक्षण करणारे बॉडीगार्ड्स देखील तितकेच महत्वाचे असतात.

28

बॉलिवूडच्या सेलिब्रटी बॉडीगार्डमध्ये सगळ्यात टॉपला सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचं नाव येतं. तो बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय बॉडीगार्ड मानला जातो, तो नेहमी भाईजानसोबत उभा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासाठी सलमान खान त्याला दरवर्षी 2 कोटी रुपये मानधन देतो.

38

बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंगचे नाव सर्वाधिक मानधन घेण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, किंग खानच्या सुरक्षेत तैनात असलेल्या रवी सिंग वर्षाला 2.7 कोटी रुपये मिळतात.

48

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बॉडीगार्ड आहे मराठमोळा युवराज घोरपडे. त्याला दरवर्षी 2 कोटी रुपये मिळतात.

58

बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बॉडीगार्डचं नाव जलाल असं आहे. अभिनेत्री त्याला 1.2 कोटी पगार देते.

68

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक बॉडीगार्डचं नाव जितेंद्र शिंदे असं आहे. अमिताभ या बॉडीगार्डला वर्षाला दीड कोटी रुपये पगार देतात.

78

श्रेयस ठेले हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा बॉडीगार्ड आहे, जो त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांसह अनेक प्रसंगी दिसतो. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता श्रेयसला वार्षिक 1.2 कोटी रुपये पगार देतो.

88

अभिनेत्री अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड आहे प्रकाश सिंह (सोनू). अभिनेत्री त्याला 1.2 कोटी पगार देते.

  • FIRST PUBLISHED :