सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पलक तिवारीने सेटवर मुलींच्या कपड्यांबाबत नियम असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.
सेटवर मुलींनी लो नेकलाईन असलेले कपडे घालावेत असा सलमानचा नियम होता. त्यानंतर सलमानला बरंच ट्रोल करण्यात आलं. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर सलमानने मौन सोडले आहे.
पलक तिवारीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सलमान खान म्हणाला, 'मला वाटते महिलांचे शरीर खूप मौल्यवान आहे. ते जितकं अधिक झाकलेलं असेल तितकं चांगलं असं मला वाटतं.'
सलमान खान पुढे म्हणाला की, आता काळ खूप बदलला आहे. तो म्हणतो, 'सध्याचे वातावरण थोडे वेगळे आहे... हे महिलांबाबत नाही. हे पुरुषांबद्दल आहे.
'पुरुष स्त्रियांकडे ज्या प्रकारे पाहतात, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या बहिणी, तुमच्या बायका, तुमच्या आई... मला ते आवडत नाही. त्यांनी या गोष्टींमधून जाऊ नये असे मला वाटते.'
महिलांच्या ऑनस्क्रीन व्यक्तिरेखेचाही त्यांनी बचाव केला आणि पुरुषांना हिरोईन आणि महिलांना अशा पद्धतीने पाहण्याची संधी देऊ नये, असा प्रयत्न असल्याचे सलमानने यावेळी सांगितले आहे.
सलमानचं हे वक्तव्य आता चाहत्यांकडून वाहवा मिळवत आहे. त्याचं म्हणणं अनेकांना पटलं आहे.
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर चाहते त्याच्या 'टायगर 3' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो शाहरुख खानसोबत 'टायगर वर्सेस पठाण'मध्येही दिसणार आहे.