मराठी सिनेमांचे साऊथ रिमेक देखील तयार करण्यात आले आहेत. प्रसिद्ध सिनेमांची यात नावं आहेत. कोणते आहेत ते सिनेमे पाहूयात.
त्याचप्रमाणे अभिनेत्री उर्मिला कोठारेची प्रमुख भूमिका असलेला मला आई व्हायचंय हा सिनेमा 2011 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा 2013मध्ये वेलकम ओबामा नावाने तेलुगू रिमेक करण्यात आला. तेलुगूमध्ये देखील अभिनेत्री उर्मिला कोठारे प्रमुख भूमिकेत होती.
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांचा मुंबई पुणे मुंबई 2 या सिनेमाचा 2018 हॅप्पी वेडिंग नावाने तेलुगू सिनेमा तयार करण्यात आला आहे.
रवी जाधवचा टाइमपास या सिनेमाचाही तेलुगू रिमेक आहे. 2014 साली टाइमपास प्रदर्शित झाला 2015 त्याचा आंध्रपोरी नावाने तेलुगू रिमेक तयार करण्यात आला.
महेश मांजरेकर दिग्दर्शित शिक्षणाचा आयचा घो हा 2010मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचा 2012 मध्ये धोनी या नावाने तेलुगू रिमेक प्रदर्शित करण्यात आला.
तात्या विंचू हे पात्र जन्माला घालणाऱ्या महेश कोठारे यांच्या झपाटलेला सिनेमाचाही तेलुहू रिमेक तयार करण्यात आलाय. 1993मध्ये आलेल्या झपाटलेला सिनेमाचा 2001 ओम्बो बोमा अशा नावाने तेलुगू रिमेक करण्यात आला.
सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सधीर जोशी यांची तगडी स्टार कास्ट असलेला अशीही बनवा बनवी हा सिनेमा आजही टॉप लिस्टमध्ये आहे. 1988 मध्ये आलेल्या बनवा बनवी सिनेमाचा चित्रम भलारे विचित्रम असा तेलुगू रिमेक तयार करण्यात आलाय.
नागराज मंजुळेंचा सैराट सिनेमा मराठी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. याच सिनेमा साऊथमध्ये रिमेक तयार करण्यात आला. ज्याच नाव आहे मनसु मलिगे. या सिनेमा रिंकू राजगुरूनेच प्रमुख भूमिका केली आहे.