सैराट सिनेमातील रिंकू राजगुरू आणि आताची रिंकू राजगुरू यांच्यात खूप बदल झालेत. त्याचप्रमाणे तिच्या लुक्समध्येही फार बदल झालेत.
सैराटनंतर रिंकूने कागर, आठवा रंग प्रेमाचा, झुंड, मेकअप सारख्या अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं.
सैराटनंतर रिंकूच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी रिंकूच्या खाण्याच्या सवयी काही बदलेल्या नाहीत.
रिंकू पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांवर ताव मारते असं तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल. हो बरोबर हे खोटंच आहे. रिंकूला पिझ्झा बर्गर अजिबात आवडत नाही.
एका मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली, "माझे मित्र मैत्रिणी पिझ्झा बर्गर खात असतील तर मी अजिबात खात नाही. मला तो प्रकार अजिबात आवडत नाही".
"पिझ्झामधली खालचा बेस मी खाऊ शकते पण पिझ्झा नाही. त्यापेक्षा तुम्ही मला 20 रुपयांची भेळ आणून द्या ती मी आवडीनं खाईन".