NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Adipurush : सैफ अली खानला वाटतेय कसली भीती? आदिपुरूषच्या प्रमोशनमध्ये कुठेच दिसला अभिनेता

Adipurush : सैफ अली खानला वाटतेय कसली भीती? आदिपुरूषच्या प्रमोशनमध्ये कुठेच दिसला अभिनेता

अभिनेता प्रभास, कृति सेनन, देवदत्त नागे, सैफ अली खान प्रमुख भूमिकते असलेला आदिपुरूष हा सिनेमा रिलीज होण्यासाठी 3 दिवस राहिले आहेत. सिनेमा 16 जून रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान सिनेमाचे कलाकार सिनेमाचं दणकून प्रमोशन करण्यात बिझी आहेत.

18

प्रभास, कृती दोघेही प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांमध्ये पोहोचले आहेत. मात्र या सगळ्यात अभिनेता सैफ अली खान अजिबात दिसला नाही. लोकांनी सैफ आणि त्याच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न उभे केले होते.

28

आदिपुरूष सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून सिनेमाची सर्वत्र चर्चा झाली. सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध देखील करण्यात आला. सिनेमाच्या ट्रेलरमधील अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या.

38

दरम्यान बिग बजेट सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता सैफ अली खान कुठेच न दिसल्यानं चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

48

सैफ अली खान मुस्लिम असल्यानं तो सगळ्या प्रमोशनल इव्हेंटपासून दूर राहत असल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. सैफ इव्हेंटसाठी आला तर आम्ही जय श्रीरामचे नारे लावू असंही म्हटलं जात आहे.

58

आदिपुरूषच्या प्रमोशनमध्ये सैफ नसण्याचे लोकांनी अनेक कारण सांगितली असली तरी एका मुलाखीत सैफने रावणाला चांगला माणूस म्हटलं असल्याचं एका युझरनं म्हटलं आहे. सैफ त्याच्या याच वक्तव्यामुळे प्रमोशनल इव्हेंटला जाण टाळत असल्याचं म्हटलं जात आहे.

68

सैफचं एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये नसण्यामागे असंही म्हटलं जात आहे की, हा सिनेमा रावणावर नाही तर प्रभू श्रीराम आणि सीता यांच्यावर आहे. त्यामुळे सैफ प्रमोशनमध्ये दिसत नाही.

78

तर काहींच्या म्हणण्यानुसार निर्मात्यांना सैफची भूमिका गुलदस्त्यात ठेवायची आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, निर्मात्यांना सिनेमाचं जास्त प्रमोशन करायचं नाहीये. सिनेमाचा सर्वाधिक फोकस हा राम म्हणजेच प्रभासवर असणार आहे. त्यामुळे प्रमोशनसाठी प्रभास असेल.

88

त्याचप्रमाणे सिनेमाच्या टीझरनंतर सुरू झालेल्या वादाचा सिनेमाच्या रिलीजवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे वादापासून दूर राहण्यासाठी निर्मात्यांनी सैफला प्रमोशनपासून पूर्णपणे दूर ठेवलं असावं. आता या मागचं खरं कारण निर्मातेच सांगू शकतात.

  • FIRST PUBLISHED :