मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूडमध्येही सर्वांचं लक्ष वेधत आहे. नुकत्याच आलेल्या 'मिमी' या सिनेमासाठी सईचं प्रचंड कौतुक झालं. मिमीसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
सईचा मिमीनंतर सईचा नवा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'इंडिया लॉकडाऊन' असं सईच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. इंडिया लॉकडाऊन या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा जगात आलेल्या कोरोना महामारीमुळे करावा लागलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचं समोर आलं आहे.
इंडिया लॉकडाऊन या सिनेमाच्या पोस्टमध्ये सईचा कोणताही बोल्ड किंवा मेकअपवाला लुक दिसत नसून सई अगदी साध्या साडीमध्ये दिसत आहे.
ती या चित्रपटात सामान्य कामगाराची भूमिका साकारणार आहे. तिचा हा साधा लूकसुद्धा चाहत्यांना पसंत पडला होता.
दरम्यान नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या ‘इंडिया लॉ़कडाऊन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या हातगाडीवर ती झोपली आहे. तर त्यांच्या टीममधला एक माणूस तीला ऊन लागू नये म्हणून छत्री पकडून उभा आहे.
या फोटोला तिने “हाच खरा स्ट्रगल... जेव्हा आम्ही चित्रपटाच्या सेटपासून खूप दूर असलेल्या ठिकाणी शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही परिस्थितीशी जुळवून घेत काम केलं. हीच जुळवून घेण्याची वृत्ती टाळेबंदीच्या काळामध्ये आपल्या कामी आली” असे कॅप्शन दिले आहे.
पण आता या पोस्टवर सईचे काही चाहते नाराज झालेले दिसून येत आहेत. त्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. 'तुझा काय स्ट्रगल, तो छत्रीवाला खरं काम करतोय', 'तो छत्रीवाला खरा उन्हात उभा आहे', 'तू निवांत आहेस, पण छत्रीवाला खरा स्ट्रगल करतोय' अशा कमेंट चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.
कोरोना महामारीवर आधारित इंडिया लॉकडाऊन या सिनेमाचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलं आहे. सिनेमात प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमराहे हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. पोस्टरमध्ये हे सगळे एका लॉकमध्ये अडकल्याचं दिसत आहे.