मनोरंजनसृष्टीत आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारुन सईने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ती स्वतः आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलताना दिसते.
सईचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असतं. सध्या ती अमेय गोसावीला डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात.
2013 मध्ये सई ताम्हणकरने अमेय गोसावी सोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती.
मात्र सई आणि अमेयचं लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. 2015 मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला.
याविषयी एकदा एका मुलाखतीत सई म्हणाली होती कि, “आताही मी माझ्या EXपतीला भेटते. ते क्षण मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आजही मी त्याच्याशी बोलते.''
एवढंच नाही तर ज्या दिवशी सईचा घटस्फोट झाला त्या दिवशी दोघांनीही पार्टी केली होती.
याविषयी कानाला खडा या कार्यक्रमात बोलताना सई म्हणाली होती कि, 'आम्ही दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन जेव्हा सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं आणि मस्त मज्जा केली.'
सईच्या या खुलाश्याने चाहते चांगलेच चकित झाले होते.