मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर घराघरात लोकप्रिय आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिने नाव कमावलं आहे.
सईने आपल्या कारकिर्दीत नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. सईने मराठी मालिकांमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
सांगलीच्या सईने आज जगभरात नाव कमावलं आहे. आज जरी ती एक यशस्वी अभिनेत्री असली तरी तिचा हा प्रवास सोपा नव्हता.
महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सईने तिच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितलं होतं. 'हाय काय नाय काय' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सईच्या वडिलांचं निधन झालं होतं.
पण वडिलांवर अंत्यसंस्कार करून त्याच्या दुसऱ्याच दिवशी सई सेटवर पोहचली होती. त्यात सईने विनोदी भूमिका साकारली होती.
अशा प्रकारे सई नेहमीच आपल्या कामाबद्दल जागरूक राहिली आहे.
एके काळी जरी सईची खडतर परिस्थिती असली तरी आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.
आज एका चित्रपटासाठी सई जवळजवळ 20 ते 25 लाखांचं मानधन घेते. मराठी चित्रपटसृष्टीत टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.