बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या तिच्या साडी लुकसाठी ओळखली जाते.
मराठीतील अगदी सगळ्याच अभिनेत्रींना साड्यांबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि सई सुद्धा त्यातलीच एक आहे.
सई कायमच तिचे साडीमधले लुक शेअर करत असते.
सध्या तिच्या नव्या लूकची बरीच चर्चा होताना दिसत आहे. यामध्ये सईने पारंपरिक नऊवारी साडी परिधान केली असून त्याला साजेसे पारंपरिक दागिने सुद्धा तिने घातले आहेत.
मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा लुक हटके ठरत आहे.
या लुकमध्ये सईने एक खास रील सुद्धा शेअर केलं आहे.
नऊवारी साडी, चंद्रकोर, डोक्यात गजरा असा अस्सल मराठी लुक फारच पसंत केला जात आहे.
अनेक चाहत्यांनी तिला कमेंट करून तिच्या या लुकची तारीफ केली आहे. तर काहींनी काहीसा काळजीचा सूर पकडला आहे.
सई सध्या कोणत्याचं नव्या प्रोजेक्टमधून का दिसत नाहीये असं सुद्धा एका युजरने तिला कमेंट करून विचारलं आहे.
अभिनयासोबत सई एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे. सई स्वतःचा ज्वेलरी ब्रँड चालवते ज्याचं नाव ‘सांज बाय सई’ असं आहे.
सईने बिग बॉस मराठीतून चाहत्यांच्या हृदयात जागा मिळवली आहे पण तिला लवकरच नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.