NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Year End : RRR ते कांतारा, बॉलिवूडला दे धक्का अन् 2022मध्ये बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमांचा डंका

Year End : RRR ते कांतारा, बॉलिवूडला दे धक्का अन् 2022मध्ये बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमांचा डंका

आरआरआर ते कांतारा बॉलिवूडला मागे टाकत 2022मध्ये हिट झालेल्या साऊथ इंडियन सिनेमांची यादी लगेच पाहून घ्या.

18

2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप चढ उताराचं गेलं. पण साऊथ सिनेसृष्टीनं मात्र यावर्षी चांगलीच मजा आणली. 2022हे वर्ष साऊथ सिनेसृष्टीसाठी महत्त्वाचं ठरवलं.

28

24 मार्च 2022ला रिलीज झालेला RRR या सिनेमानं चांगली कमाई केली. सिनेमाचं बजेट 555 करोड रुपयांचं होतं. सिनेमात एकूण 1.144 करोडची कमाई केली.

38

KGF च्या सक्सेसनंतर 14 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या KGF2 भारतात एकूण 991ची कमाई केली. सिनेमाचं बजेट 100 कोटी होती.

48

भारतीय सिनेसृष्टीत यंदा कांतारा हा सिनेमा सर्वाधिक सुपरहिट सिनेमा ठरला. रोहित शेट्टीच्या कांतारानं भारतात 393 करोडची कमाई केली.

58

अभिनेता विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवि अशा अनेक स्टारकास्टनं भरलेल्या पोन्नियिन सेलवन या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 467 करोडची कमाई केली.

68

5 ऑगस्टला रिलीज झालेला सीता रामम हा रोमँटिक तेलुगू सिनेमा 30 करोडच्या बजेटमध्ये 91 कोटी रुपये कमावण्यात यशस्वी झाला. अभिनेत्री मृणाल ठाकूर, रश्मिका मंदाना, दुलकीर सलमान, सुमंत सिनेमात प्रमुख भूमिकेत होते.

78

अभिनेता कमल हसन, फहद फासिल आणि विजय सेतुपति यांच्या प्रमुख भूमिका असलेला विक्रम हा सिनेमाही यंदा गाजला. सिनेमानं जवळपास 333 कोटींचं कलेक्शन केलं.

88

सुदीपा प्रमुख भूमिकेत आणि निरुप भंडारी, नीता अशोक, जॅकलिन फर्नांडिस यांच्या सपोर्टिंग भूमिका असलेला विक्रांत रोना हा कन्नड एक्शन थ्रिलर सिनेमाही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात यशस्वी ठरला. सिनेमानं 159 करोड कमावले.

  • FIRST PUBLISHED :