NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / खिशात 6 रूपये घेऊन गाठली मुंबई, हॉटेलमध्ये घासली भांडी; पण नशिब पालटलं अन् झाला स्टार

खिशात 6 रूपये घेऊन गाठली मुंबई, हॉटेलमध्ये घासली भांडी; पण नशिब पालटलं अन् झाला स्टार

हाजारो तरूण मुंबईत अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात. असाच एक तरूण मुंबईत अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्याच्या खिशात फक्त सहा रूपये होते.

15

हाजारो तरूण मुंबईत अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात. असाच एक तरूण मुंबईत अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन आला होता. या तरूणाच्या वडिलांकडे तेवढे पैसे नव्हते, पण प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. त्याच्या खिश्यात फक्त सहा रूपये होते. हा अभिनेता म्हणजे रोनित रॉय होय. रोनित जवळपास 4 वर्षे सुभाष घईंसोबत त्यांच्या घरी राहिले आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत असताना मुंबईत काम शोधू लागले. (फोटो साभार: Instagram @ronitboseroy)

25

मुंबईत आपला खर्च भागवण्यासाठी रोनित रॉयने हॉटेलमध्ये भांडी घासण्यापर्यंतचे काम केले, तर दुसरीकडे त्याने मॉडेलिंग सुरू केले. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी 600 रुपये पगार मिळाल्यावर त्याने पहिला पगार आईला पाठवला. रोनित रॉयने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने असेच ऑडिशन दिले होते, त्यानंतर दिग्दर्शक दीपक बलराजने त्याला 'जान तेरे नाम' चित्रपटाची ऑफर दिली होती. 1992 च्या चित्रपटातील गाण्यांसोबतच ते प्रसिद्धही झाले, पण त्यानंतर ते जवळपास 4-5 वर्षे काम शोधत राहिले.

35

यानंतर मात्र रोनित रॉयला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याचे पहिल्या पत्नीसोबतचे नातेही बिघडले. इच्छा नसतानाही मुलगी ओनापासून वेगळे व्हावे लागले. यानंतर तो टीव्हीकडे वळला, त्यानंतर 'कसौटी जिंदगी की' मधील मिस्टर बजाजच्या व्यक्तिरेखेने तो घराघरात पोहचला. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' आणि 'अदालत'मध्येही त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.

45

रोनित रॉयने 'उडान', '2 स्टेट्स', 'शूटआउट अॅट वडाला', 'मुन्ना मायकल' आणि 'उगली' यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. सेलिब्रेटींना सुरक्षा देण्याचे कामही त्याची कंपनी करते. (फोटो क्रेडिट्स: Instagram @ronitboseroy)

55

रोनित रॉय आज एक यशस्वी अभिनेता आहे. 2003 मध्ये त्यांनी मॉडेल आणि अभिनेत्री नीलम सिंगसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मुलीचे नाव आडोर आणि मुलाचे नाव अगस्त्य असं आहे.(फोटो साभार: Instagram@ronitboseroy)

  • FIRST PUBLISHED :