आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलियाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण, तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिच्या सुरुवातीच्या काळात ती तिच्या अपुऱ्या सामान्य ज्ञानासाठी ओळखली गेली.
सुरुवातीच्या काळात आलियाला खूप ट्रोल केलं गेलं. मात्र, अभिनेत्री ट्रोलिंगमुळे खचलेली नाही.
आलिया फक्त तिच्या कामाबद्दल जागरूक असते आणि त्या बदल्यात तिला प्रसिद्धी देखील मिळते.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आलियाला याबद्दल विचारण्यात आले होते की, तिला यंग इन्फ्लुएन्सर म्हणणे योग्य आहे का? यावर तिने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
या प्रश्नाला उत्तर देताना आलिया म्हणाली की, 'जोकरही म्हणा काही हरकत नाही, फक्त चेक वेळेवर मिळाला पाहिजे.' आलियाने दिलेल्या या उत्तराची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
आलियाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे तर ती शेवटची 'ब्रह्मास्त्र : पार्ट वन'मध्ये रणबीर कपूरसोबत दिसली होती. दुसरीकडे, आलिया सध्या करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती रणवीर सिंगसोबत दिसणार.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया आणि रणवीर सोबतच जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
नुकतेच निर्मात्यांनी 'तुम क्या मिले' हे पहिले गाणे आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.