अभिनेत्री आलिया भट्ट वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. येणाऱ्या काळात अभिनेत्री करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'या चित्रपटात झळकणार आहे.
आलिया भट्टने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
या स्टार कपलने लेकीचं नाव राहा असं ठेवलं आहे. आलियाची लेक राहा फक्त आठ महिन्यांची आहे. तिचा चेहरा अजूनही सगळ्यांपासून लपवून ठेवलेला आहे.
आलियाने आपल्या आठ महिन्यांच्या लेकीचं करिअर आधीच प्लॅन केलं आहे. नुकतंच तिने राहा भविष्यात काय बनेल याविषयी खुलासा केला आहे.
आलियाने नुकतंच ती लेकीला सायन्टिस्ट बनवणार असल्याचं सांगितलं.
राहाचे आई वडील आलिया आणि रणबीर कपूरच शिक्षण फारच कमी झालेलं आहे.
आलियाच्या शिक्षणा बद्दल सांगायचं तर ती स्वतः १२ वी देखील पास झाली नाहीये. आलिया 12 वीत असतानाच करण जोहरने तिला चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची संधी दिली.
तेव्हा महेश भट्ट यांनी देखील आलियाला पाठींबा दिला आणि आलिया 12 वीतच शिक्षण सोडून देऊन तयारीला लागली.
रणवीर बद्दल सांगायचं तर त्यानं न्यूयॉर्कच्या स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे.