'कुमकुम भाग्य' सारखी टेलिव्हिजनची लोकप्रिय मालिका, 'जर्सी', 'सुपर 30' सारख्या दमदार सिनेमाची सुंदर अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
मृणाल लव्ह सोनिया सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.सिनेमाला जास्त प्रतिसाद मिळाला नसला तरी हा सिनेमा मृणालसाठी खूप महत्त्वाचा होता, असं तिनं न्यूज18 रायझिंग इंडिया कार्यक्रमात सांगितलं.
मृणाल म्हणाली, "माझ्या आई-वडिलांनाही भीती वाटत होती की सिनेमा आणि टीव्हीमध्ये माझं करिअर होईल का? मला चांगल्या भूमिका मिळतील का".
"मी 10 वर्षे टेलिव्हिजनवर काम केलं. त्यानंतर मला 'लव्ह सोनिया' हा सिनेमा मिळाला. माझ्या करिअरमध्ये या सिनेमाला खूप महत्त्व आहे".
"लव्ह सोनियानंतर माझ्यात खूप बदल झाले. त्यानंतर मराठी, हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलगू भाषेतील सिनेमे मिळू लागले. मला आता आणखी चांगलं काम करायचे आहे".
अभिनेत्री मृणाल ठाकूरने न्यूज18 रायझिंग इंडियाच्या कार्यक्रमात सांगितलं की, "मला आनंद आहे की मी अशा वेळी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे जेव्हा सिनेसृष्टी खूप गतिमान झाली आहे".
"आता परिस्थितीही खूप बदलली आहे. आता टेलिव्हिजन अभिनेत्री किंवा सिनेमातील अभिनेत्री नाहीत, तर फक्त भारतीय अभिनेत्री आहेत".
मृणाल पुढे म्हणाली, "हे भारतीय सिनेमांचं युग आहे. नुकतेच दोन ऑस्कर अवॉर्ड देखील देशात आले आहेत. मराठी, तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये काम करण्याच्या संधी मिळत असताना मी काम करत आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो" .