NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kantara :'कांतारा 2' बद्दल रिषभ शेट्टीची मोठी घोषणा; चित्रपटाच्या कथानकाबद्दल केला मोठा खुलासा

Kantara :'कांतारा 2' बद्दल रिषभ शेट्टीची मोठी घोषणा; चित्रपटाच्या कथानकाबद्दल केला मोठा खुलासा

कांतारा हा सिनेमा मागच्या वर्षात प्रचंड गाजला. या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात लोकप्रिय झाला. आता याच रिषभ शेट्टीने कांताराच्या पुढच्या भागाबद्दल मोठी घोषणा केली आहे.

110

कांतारा हा सिनेमा मागच्या वर्षात प्रचंड गाजला. या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

210

'कांतारा 2' या चित्रपटाने जगभरात खळबळ माजवणारा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आता लवकरच या चित्रपटाचा आधीचा भाग म्हणजेच प्रीक्वल घेऊन येत आहे.

310

रिषभ शेट्टीने प्रीक्वलशी संबंधित एक खास अपडेट शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

410

अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'कंतारा 2' ही एका देवतेच्या पौराणिक कथा होती, जी आधी फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाली होती. पण चित्रपटाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि मागणी यामुळे तो संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला.

510

आणि मग 'कांतारा'ने काय केलें हे सर्वानीच पाहिलं. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 400 ते 450 कोटींची विक्रमी कमाई केली.

610

तेव्हापासून चाहते कांताराच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. पुढच्या भागात कथा काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. पण या चित्रपटाचा पुढचा नाही तर पहिला भाग आणणार असल्याचं रिषभ शेट्टीने म्हटलं आहे.

710

म्हणजेच जी ​​कथा 'कांतारा 2' मध्ये दाखवण्यात आली होती, त्यामागील कथा पहिल्या भागात दाखवण्यात येणार आहे.

810

'कांतारा' चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याची माहिती आहे. हा चित्रपट अजूनही अनेक ठिकाणी चित्रपटगृहात दाखवला जात आहे. हे साजरे करण्यासाठी, निर्मात्यांनी नुकतीच एक सक्सेस पार्टी दिली.

910

यादरम्यान रिषभने सांगितले की, त्याने 'कांतारा'च्या प्रीक्वलची कथा लिहायला सुरुवात केली आहे. ऋषभने सांगितले की, हा 'कांतारा 2' आहे पण त्याची प्रीक्वल स्टोरी असेल.

1010

प्रीक्वल 2024 मध्ये रिलीज होईल. प्रीक्वलची कल्पना त्याला केव्हा आणि कशी सुचली याचा खुलासा रिषभने केला आहे. तो म्हणाला, 'कंटारा 2'चे शूटिंग करत असताना प्रीक्वल बनवण्याचा विचार माझ्या मनात आला. सध्या या चित्रपटावर संशोधन सुरू आहे आणि त्यामुळे काहीही सांगणे चुकीचे ठरेल.' असं तो म्हणाला आहे.

  • FIRST PUBLISHED :