अभिनेत्री रिंकू राजगुरू कायमच शांत आणि मितभाषी स्वभावाची म्हणून वावरताना दिसते.
रिंकूने सैराटमधून एंट्री केली आणि एक आघाडीची अभिनेत्री म्हणून आता ती समोर येत आहे.
तिने साडीमध्ये नुकतंच केलेलं एक फोटोशूट खूप viral होताना दिसत आहे.
रस्ट ऑरेंज रंगाची साडी, ज्वेलरी आणि मेकअप असा सुंदर लुक तिने साकारला आहे.
रिंकू स्वभावाने शांत आहे पण तिचे फोटो कायमच दंगा घालताना दिसतात.
रिंकूच्या या फोटोंना सुद्धा चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.
आज तिच्याकडे एक गुणी आणि अभ्यासू नटी म्हणून पाहिलं जातं .
रिंकूने जांभळ्या साडीमध्ये टाकलेला फोटोसुद्धा खूप पसंत केला जात आहे.
सध्या रिंकू ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.