बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येत आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल येत्या 6 ऑक्टोबरला लग्नगाठ बांधणार आहेत.
दरम्यान दोघेही आपल्या प्री वेडिंग फंक्शन्सचा आनंद घेत आहेत. रिचा आणि अली आपल्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांतील क्षण मोठ्या उत्साहाने जगत आहेत.
त्यांचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
या फोटोंमध्ये रिचा आणि अली अगदी थाटामाटात तयार झाले आहेत. या दोघांचा रॉयल लुक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
लखनऊमध्ये अलीचं घर आहे आणि त्याठिकाणी अली आणि रिचाचे प्री वेडिंग फंक्शन मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत आहेत.
अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनर्सनी डिझाइन केलेल्या त्यांच्या कॉउचर पोशाखात रिचा चढ्ढा आणि अली फझल खूपच रॉयल दिसत आहेत.
नुकताच यांच्या लग्नाआधी कुटुंबाने एक गेट टुगेदर केले होते. त्यासाठी या दोघांनी हा लूक केला होता.
.या कार्यक्रमाची सुरुवात राजस्थानच्या साबरी ब्रदर्सच्या उत्साही कव्वाली सादरीकरणाने झाली. सोनेरी कस्टम मेड ड्रेप्स, झूमर मेणबत्ती धारकांसह अवधी लखनौवी संस्कृतीला साजेशी सजावट होती.
त्यांचा हा राजेशाही थाट चाहत्यांना फारच आवडला आहे.
त्यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमातील हे फोटो क्षणार्धात व्हायरल झाले आहेत.