अनेक अभिनेत्रींचं प्रेम नेहमीच पेपरमध्ये छापण्यात आलं आहे. पण आज अशा प्रेम युगुलांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांनी लग्नाची कोणतीही काळजी न करता विवाहीत कलाकारांवर जिवापाड प्रेम केलं.
बॉलिवूडमध्ये 80च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रेखानं साऊथ सिनेमात देखील आपलं नाव कमावलं. रेखा साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री होती.
रेखा आज 68 वर्षांची असून तिचं वैयक्तिक आयुष्य सुखात घालवते आहे. करिअर पिकवर असताना अमिताभ आणि रेखा यांच अफेअर खुप गाजलं होतं. अमिताभ यांचं लग्न झालेलं असताना रेखा त्यांच्या प्रेमात पडली.
साऊथ अभिनेत्री नयनताराने विग्नेश शिवानबरोबर लग्न केलं होतं. लग्नाआधी अभिनेत्री नयनतारा कोरिओग्राफर प्रभुदेवाबरोबर रिलेशनमध्ये होती. मात्र तिने हे कधीच खुलेपणाने मान्स केलं नाही असं म्हणतात.
अभिनेत्री तब्बूने देखील आधी साऊथ सिनेमात आपली ओळख बनवली होती. तब्बूने आजवर लग्न केलेलं नाही. ती आजही सिंगल आहे.
तब्बू विवाहीत असलेल्या साऊथ सुपरस्टार नागार्जुबरोबर रिलेशनमध्ये होती असं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, नागार्जुन लग्नानंतरही तब्बूबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. 10 वर्ष दोघांचं अफेअर होतं.
साऊथ सिनेमाची मोठी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीनं बॉलिवूडमध्ये देखील अनेक हिट सिनेमे केले. मीनाक्षीचं कुमार सानू यांच्याबरोबर अफेअर होतं. लग्न झालेलं असताना कुमार सानू मीनाक्षीबरोबर रिलेशनमध्ये होते.
तमिळ सिनेमातील अभिनेत्री गौतमी तिडमल्ला आणि अभिनेत्री कमल हासन यांच्या अफेअरच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत्या.
कमल हासनचं लग्न गौतमीबरोबरच्या अफेअरमुळेच तुटलं असं म्हटलं जातं. तर गौतमीचं आधी लग्न झालं होतं. पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन ती कमल हासनबरोबर रिलेशनमध्ये होती.