गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांही कायम त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळतात.
सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघांचा फोटो कोलाज केलेला दिसत आहे.
फोटोमध्ये चाहत्यांचं लक्ष केंद्रीत करणारी गोष्ट म्हणजे दोघे एकाच ठिकाणी असल्याचं दिसत आहे.
फोटो व्हायरल होताच दोघांनी नव्या वर्षाचं स्वागत मालदीवमध्ये केल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला.
सांगायचं झालं तर, विजय-रश्मिका दोघांनी नव्या वर्षाचं स्वागत मालदीवमध्ये केलं. पण दोघांनी याबद्दल चाहत्यांना सांगितलेलं नाही.
महत्त्वाचं म्हणजे दोघांची जोडी चाहत्यांना रिल आणि रियल आयुष्यात देखील आवडते. दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.
एवढंच नाही, तर दोघांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिल्या.
खास फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘एक वर्ष जे काही क्षणांसाठी कायम खास राहिल… जेव्हा आपण एकत्र हासलो, गुपचूप रडलो, स्वप्नाचा पाठलाग केला, काही गोष्टी जिंकलो, तर काही गमावलं…. सर्व क्षण साजरा करण्याची गरज आहे… कारण हे आयुष्य आहे…’ असं खास कॅप्शन अभिनेत्याने लिहिलं.
एक फोटो पोस्ट करत रश्मिकाने कॅप्शनमध्ये, ‘Hello 2023…’ असं लिहिलं आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.