साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' चित्रपट 17 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या केमिस्ट्रीला लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि याच कारणामुळे दुसऱ्या वीकेंडमध्ये 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. त्यामुळं हैदराबादमध्ये चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत रश्मिका उपस्थित होती.
ही सक्सेस पार्टी 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार यांनी हैदराबादमध्ये आयोजित केली होती. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना यांच्याशिवाय अनसूया भारद्वाज सारखे स्टार्स पोहोचले होते. इतकंच नाही तर अॅक्शन डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा आणि अल्लू अरविंद हे सुद्धा पार्टीत उपस्थित होते.
पार्टीमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी आपल्या आकर्षक स्टाइलने लोकांची मनं जिंकली. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर करण्यात आले आहे.
यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि जॉगरमध्ये दिसला. त्याचवेळी रश्मिका मंदाना पार्टीमध्ये आकर्षणाचे केंद्र बनली.
यावेळी रश्मिका रेड कलरच्या आउटफिटमध्ये दिसली.
रश्मिका आपल्या स्टायलिश एक्सप्रेशनमुळं नेहमीच चर्चेत असते. आता पुष्पा या चित्रपटाच्या यशामुळं तिचं फार कौतूक करण्यात येत आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनने आपल्या मित्रांसोबत पार्टीत चांगलीच मजा केली आहे.
यावेळी अल्लू अर्जुन 'पुष्पा द राइस' च्या टीम ने एक सामुहिक फोटो ही शेयर केला आहे.