रणबीर कपूर सध्या 'तू झूठी मै मक्कार' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
संजू' च्या भरघोस यशानंतर रणबीर कपूर पुन्हा बायोपिकमध्ये दिसणार असून यावेळी तो एका लोकप्रिय क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे.
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहेत. आता लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा जीवनपटही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.
या बायोकपिकमध्ये रणबीर कपूर सौरव गांगुलीची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रणबीरने अंतिम स्क्रिप्टला होकार दिला असून लवकरच कोलकात्यातही शूटिंग सुरू होणार आहे.
2019 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह मोठ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत.
टीम इंडियाचा माजी कर्णधार पडद्यावर कोणाची भूमिका साकारणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र रणबीर कपूरचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे.
या बायोपिकच्या शूटिंगपूर्वी रणबीर कोलकाताच्या आयकॉनिक ईडन गार्डन्स, सीएबी ऑफिस आणि सौरव गांगुलीच्या घराला भेट देणार आहे अशी माहिती देखील समोर येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, हा बायोपिक एक बिग बजेट चित्रपट असणार आहे, ज्याची किंमत 200-250 कोटी रुपये असेल.