आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याने अलीकडेच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
रणबीर लंडनमध्ये 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. पण या सगळ्यातही त्याने आलियासाठी वेळ काढला.
रणबीर लंडनमध्ये 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. पण या सगळ्यातही त्याने आलियासाठी वेळ काढला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रणबीर पत्नी आलियासोबत एक दिवसासाठी मुंबईत परतला. त्याने आलियाला एक खास गिफ्ट देखील दिलं आहे.
मुंबईला परतताना रणबीर कपूर हातात बॅग घेऊन दिसला. त्याने आलिया भट्टसाठी लंडनमधून 'चॅनेल' या ब्रँडची बॅग खरेदी केली आहे.
आलिया आणि रणबीर त्यांच्या नवीन घराच्या बांधकाम साइटला भेट देताना दिसले आणि अभिनेत्रीने तीच गुलाबी चॅनेल स्लिंग बॅग घेतली.
रणबीरने आलियाला गिफ्ट दिलेल्या या बॅगची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.
दरम्यान, त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलियाने तिच्या लग्नातील न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
आलियाने शेअर केलेले हे अनसीन फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.