मराठी बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच साउथ इंडियन कलाकारांनीही मोठ्या दिमाखात स्वातंत्र्यदिवस साजरा केलाय. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'आम्ही भारतीय आहोत! खुश आहेत, गर्व आणि स्वतंत्र आहोत. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा', असं म्हणत अभिनेता विजय देवरकोंडानं शुभेच्छा दिल्यात.
तर साउथ इंडियन अभिनेत्री आकांक्षा सिंहनं थेट वाघा बॉर्डरवर हजेरी लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. तिथले जवानांबरोबरचे फोटो तिनं शेअर केलेत.
RRR आणि बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी स्वातंत्र्यदिनी पारंपरिक वेशभूषेत सपत्नीक शुभेच्छा दिल्यात.
अभिनेता ज्युनिअर एनटीआरनं ट्विटवर देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
अभिनेता राम चरणनं देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्यात. त्यानं म्हटलंय, 'आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून संघर्ष करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्यसेनानीचं स्मरण करुया. आज घरोघरी तिरंगा फडकताना पाहून गर्व वाटतो'.
तर सुपरस्टार रजनीकांत यांनी खास व्हिडीओ शेअर करत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
KGF स्टार अभिनेत्यानं त्याच्या कुटुंबाबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा केला. हातात तिरंगा घेऊन त्यांनं फोटो शेअर केलेत.