बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रकुलने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून चाहत्यांना सध्या धक्काच बसला आहे.
रकुलने बॉलिवूडसहित साऊथच्या सिनेमांमध्ये दमदार अभिनय करत नाव कमावलं आहे.
रकुलचा चाहतावर्ग देखील मोठा आहे, पण आता तिने असं काही केलंय की चाहत्यांमध्ये तिच्या या कृतीची जोरदार चर्चा आहे.
रकुल प्रीतने बर्फाळ भागात क्रायोथेरपी घेत असलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये रकुल बिकिनीमध्ये बर्फाच्या थंड पाण्यात डुंबताना दिसत आहे.
रकुलने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, बाहेरचे तापमान -15 डिग्री सेल्सिअस आहे. या गोठवणाऱ्या थंडीत रकुल प्रीतही पाण्यात डुंबते आणि यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे हास्यही कायम असते.
रकुलच्या या कामगिरीचं चाहते कौतुक करत असून तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रकुल प्रीत शेवटची 'छत्रीवाली' तसेच अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबत थँक गॉड या चित्रपटामध्ये दिसली होती.
रकुल प्रीतच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.