NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Raj Kapoor: विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीवर जडलं होतं राज कपूर यांचं प्रेम; पण पत्नीमुळे लव्हस्टोरीचा दी एन्ड

Raj Kapoor: विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीवर जडलं होतं राज कपूर यांचं प्रेम; पण पत्नीमुळे लव्हस्टोरीचा दी एन्ड

राज कपूर यांची खासकरून प्रेमकथेतील रोमँटिक हिरो साकारणं ही स्पेशालिटी होती. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे रंजक आहे. विवाहित असूनही एका प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगली होती. आज जाणून घ्या खास तो किस्सा.

18

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चमचमता तारा म्हणजे राज कपूर. ते केवळ प्रसिद्ध अभिनेतेच नाही तर एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. 14 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानमध्ये जन्मलेले राज कपूर हे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावत असत.

28

प्रेमकथेतील रोमँटिक हिरो साकारणं ही राज कपूर यांची स्पेशालिटी होती. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे रंजक आहे. आज जाणून घ्या खास तो किस्सा.

38

त्याकाळी राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक होते. त्यांचे लग्न कृष्णा कपूरशी झाले होते. पण असं असलं तरी पुन्हा प्रेमात पडण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकलं नाही.

48

अभिनेत्री नर्गिसवरचे त्यांचे निस्सीम प्रेम सर्वांनाच कदाचित माहीत आहे पण त्या व्यतिरिक्त हा सुपरस्टार अजून एका अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करत होता.

58

अभिनेत्री म्हणजे वैजयंतीमाला. राज आणि वैजयंतीया दोघांनी नजराना (1961) आणि संगम (1964) या दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे.

68

मीडिया रिपोर्टनुसार राज कपूर आणि वैजयंतीमाला एकमेकांच्या प्रेमात होते आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र होती.

78

पण जेव्हा त्याची पत्नी कृष्णा कपूरला त्याच्या अभिनेत्रीसोबतच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा ती राज यांचं घर सोडून हॉटेलमध्ये राहायला गेली.राज यांची पत्नी कृष्णा सुमारे साडेचार महिने नटराज हॉटेलमध्ये राहिली होती.

88

यानंतर शेवटी, भविष्यात अभिनेत्री वैजयंतीमालासोबत काम करणार नाही या अटीवर तिने घरी जाण्यास होकार दिला. राज कपूर यांनी सुद्धा ही अट मान्य केली आणि या वैजयंतीमालासोबत पुन्हा कधीही काम केले नाही.

  • FIRST PUBLISHED :