प्राजक्ता माळी ही अभिनेत्री सध्या बरीच चर्चेत असते. रानबाजार आणि Y अशा दोन वेगळ्या धाटणीच्या प्रोजेक्टमध्ये ती एकदम वेगळ्या ढंगाच्या भूमिकांमध्ये लागोपाठ दिसून आली. त्यासाठी तिचं बरंच कौतुक सुद्धा झालं.
सध्या या अभिनेत्रीने काही नवे फोटो शेअर केले असून त्याचं कारण साधंसुधं नाहीये. महाराष्ट्राची हास्यजत्रा आता नव्या सिझनसह परत येत आहे आणि त्याच निमित्ताने तिचे कायम होणारे फोटोशूट परत आल्याने सध्या ती आनंदात आहे.
Hasyajatra photoshoot posts are back असं म्हणत तिने काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
एका लुकमध्ये मध्ये ती गुलाबी रंगाच्या घागऱ्यात दिसत आहे तर दुसऱ्या लुकमध्ये तिने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या दोन्ही लुकमध्ये प्राजक्ताने बहार आणली आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.
तिच्या आउटफिट पेक्षा सध्या लक्ष वेधून घेत आहेत त्या तिच्या फोटोखालच्या कॅप्शन.
एकीकडे ना.धो.मनोहर यांच्या एक प्रसिद्ध पावसावरील गीतातील काही ओळी तिने शेअर केल्या आहेत.
तर दुसऱ्या आउटफिटसाठी तिने एक हिंदी शायरी लिहून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. यामध्ये ती असं लिहिते, तेरे फ़ैसले पे सवाल न उठाऊँ यही मेरा इश्क़ है । - ओशो ♥️ तुझ्या कोणत्याच निर्णयावर प्रश्नोत्तरं न करणं हे माझं प्रेम आहे असं ती लिहिते.
या दोन्ही आउटफिटवरील फोटोवर तिला भरभरून कमेंट सुद्धा आल्या आहेत.