प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सेहगल नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
अभिनेत्रीनं 7 जूनला लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. मोठ्या थाटात तिचा विवाह सोहळा पार पडला.
34 वर्षांच्या सोनाली सेहगलनं बॉयफ्रेंड आशिष सजनानीबरोबर लग्नगाठ बांधली
लग्न जरी सोनालीचं असलं तरी चर्चा मात्र तिच्या लाडक्या कुत्र्याची रंगली आहे.
आशिषच्या हातात हात देण्याआधी सोनालीने तिच्या लाडक्या कुत्र्याबरोबर मंडपात दमदार एंट्री घेतली.
सोनालीच्या कुत्रीनं देखील सोनालीबरोबर पिंक कलरचं ट्विनिंग केलं होतं. कुत्री देखीन सोनालीची एंट्री एन्जॉय करताना दिसली.
सोनाली सेहगलच्या लग्नाच्या एंट्रीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.