अल्लू अर्जुनने खूपच लवकर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. अभिनयाच्या जोरावर अल्लूने सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला असून सध्या त्याच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.. (twitter/allu arjun)
मनोरंजन विश्वात अल्लू अर्जुननं जेवढी प्रसिद्धी मिळवली आहे, तितकी प्रसिद्धी त्याचा धाकटा भाऊ शिरीषला मिळू शकलेली नाही. तमिळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या शिरीषने 2013 मध्ये 'गौरवम' या चित्रपटातून पदार्पण केले होते.
अल्लू शिरीषचा जन्म 30 मे 1987 रोजी हैदराबादयेथे झाला. 36 वर्षीय शिरीषचे वडील अल्लू अरविंद हेदेखील सिनेसृष्टीचा एक भाग आहेत. शिरीषचा पहिला चित्रपट 'गौरवम'मध्ये त्याच्यासोबत यामी गौतम दिसली होती.
शिरीषचा पहिलाच चित्रपट पडद्यावर कमाल करू शकला नाही. यानंतर 2014 मध्ये 'कोथ जनता' या रोमँटिक कॉमेडी सिनेमात तो झळकला, ज्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. यानंतर त्यांच्या काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला.
2017 मध्ये शरीषने मोहनलाल या चित्रपटातून मल्याळम चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. शिरीष सिनेसृष्टीत वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करत आहे, जेणेकरून तो स्वत:ला एक चांगला कलाकार म्हणून प्रस्थापित करू शकेल.
शिरीष 10 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे, पण भाऊ अल्लू अर्जुनला जेवढे यश मिळाले आहे तेवढे त्याला अजूनही मिळालेले नाही. हिंदी सिनेमा जगतात तर त्यांचे नाव पूर्णपणे अनोळखी असचं आहे.