प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडमध्ये देखील तिने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेत्री महागड्या वस्तू नेहमीच वापरतात पण काही दिवसांपूर्वी प्रियांकाने घातलेल्या एका नेकल्सची तुफान चर्चा रंगली होती.
काही दिवसांपूर्वीच मेट गालाचा सोहळा पार पडला.
यावेळी प्रियांकाच्या लूकची खूपच चर्चा झाली होती. तिने तिचा नवरा निक जोनाससोबत हजेरी लावली होती.
प्रियांकाने ब्लॅक सेक्सी गाऊन परिधान केला होता. तिच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
पण तिच्या ड्रेसपेक्षा यावेळी तिच्या नेकलेसचीच जास्त चर्चा होती.
तिने यावेळी 11.6 कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. पण तिच्या या नेकलेसची किंमत खूपच जास्त होती.
प्रियांकाने परिधान केलेल्या या नेकल्सची किंमत अंदाजे 204 कोटी एवढी होती.