देसी गर्ल प्रियांका चोप्रा काही दिवसांआधीच भारतात आली आहे.
प्रियांका यावेळी लेक मालती मॅरी आणि नवरा निक जोनस यांनाही बरोबर आणलं आहे.
लेकीला घेऊन भारतात येताच प्रियांका तिला घेऊन आधी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाली आहे.
प्रियांकानं नुकतंच मालती मॅरीला घेऊन मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
प्रियांका सिद्धिविनायकाला आल्यानं तिच्यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लेकीला घेऊन प्रियांका सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात जाताच चिमुकली मालती बाप्पाकडे पाहतच राहिली.
मंदिराच्या गाभाऱ्यातील संपूर्ण माहोल मालतीला आवडला असं दिसलं. कोणताही आवाज किंवा रडारड न करता अगदी शांतपणे मालतीनं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
प्रियांका आणि लेक मालतीला पाहण्यासाठी मंदिर परिसरात चाहत्यांची गर्दी झाली होती.
मंदिर प्रशासनानं प्रियांकाचा शाल श्रीफळ आणि सिद्धिविनायकाची मुर्ती देऊन सन्मान केला.
सिद्धिविनायकला आलेली प्रियांका आपले संस्कार विसरली नाही. सुंदर पिस्ता कलरच्या ड्रेसमध्ये प्रियांका दर्शनला आली होती.