प्रियांका चोप्रा ऑस्करपूर्वी साऊथ एशियन एक्सलन्स इव्हेंटमध्ये नुकतीच सहभागी झाली होती.
प्रियांका सोबत यावेळी तिचा पती निक जोनास देखील सहभागी झाला होती.
प्रियांका चोप्राने या इव्हेंटसाठी तिच्या लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या हटके लूकने लक्ष वेधलं आहे.
प्रियंका चोप्राने टू-पीस ड्रेससोबत फर जॅकेट घातले होते. ज्यामध्ये तिने क्रॉप टॉप आणि फिश कट स्कर्ट घेतला होता.
प्रियांकाने तिचा लूक अतिशय साधा आणि ग्लॅमरस ठेवला होता. तिने आपले केस मोकळे ठेवले होते आणि न्यूड मेकअपचा पर्याय निवडला.
प्रियांकाने तिच्या लूकसोबत मिनिमम ज्वेलरी कॅरी केली होती.
प्रियांकाच्या या लूकचं चाहते चांगलंच कौतुक करत आहेत.
यावेळी ऑस्कर भारतासाठी खूप खास असणार आहे, यात दिपीकासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.