प्रियांका चहर चौधरी 'बिग बॉस 16' ची विजेती होऊ शकली नसली तरी तिने लाखो लोकांची मने नक्कीच जिंकली आहेत. शोमधून बाहेर पडल्यापासून ती सतत चर्चेत असते.
तिला लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याबद्दल आता प्रियंकाने ती लवकरच एका शोमध्ये दिसणार असल्याचा खुलासा केला आहे.
प्रियांकाने तिला रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' साठी ऑफर आली आहे असा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
'खतरों के खिलाडी 13' साठी प्रियांकाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
या मुलाखतीत प्रियंकाने 'मला या शो साठी ऑफर आली आहे पण तिथे होणाऱ्या स्टंट्सना मी घाबरत आहे असा खुलासा केला आहे.
खरं तर, प्रियांकाला बर्याच गोष्टींची भीती वाटते आणि या शोमध्ये उंचीवरून कीटकांपर्यंत उडी मारण्यापासून धोक्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिच्या मनात सहभागी होण्याविषयी भीती आहे.
प्रियंकाला लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता ती या शो मध्ये दिसणार कि नाही याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर, प्रियांका लवकरच बिग बॉसचा स्पर्धक अंकित गुप्ता सोबत एका म्युझिक व्हिडिओत झळकणार आहे.