NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prasad Oak: प्रसाद ओकच्या लग्नाला पूर्ण झाली 25 वर्ष; कशी सुरु झाली यांच्या 'प्रेमाची गोष्ट'?

Prasad Oak: प्रसाद ओकच्या लग्नाला पूर्ण झाली 25 वर्ष; कशी सुरु झाली यांच्या 'प्रेमाची गोष्ट'?

प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक त्याची बायको मंजू यांच्या लग्नाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकदा सोशल मीडिया पोस्टवरून या दोघांचं एकमेकांवरील प्रेम दिसून येतं. आज या दोघांनीही एकमेकांसाठी खास रोमँटिक पोस्ट केल्या आहेत. पण यांची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली जाणून घ्या...

110

प्रसाद ओक त्याची बायको मंजू यांच्या लग्नाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.प्रसादप्रमाणेच मंजिरी सुद्धा कलाविश्वात सक्रिय आहे.

210

प्रसाद आणि मंजिरीचं अरेंज मॅरेज आहे. या दोघांची लव्हस्टोरी फिल्मी आहे.

310

अभिनयविश्वात पदार्पण करण्याआधी प्रसाद एक अभिनयाचा वर्कशॉप घेत होता. या वर्कशॉप मध्ये अभिनय शिकायला मंजिरी देखील यायची.

410

या वर्कशॉपमध्येच या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. या वर्कशॉप नंतर दोघांचा कॉन्टॅक्ट वाढला. दोघांचा सहवास वाढला आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

510

पण त्यांच्या लव्हस्टोरीत मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे मंजिरीच्या घरच्यांनी दोघांच्या नात्याला विरोध केला. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी अखेर 7 जानेवारी 1998 रोजी लग्नगाठ बांधली.

610

या दोघांनी आज सुखी सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केली असून त्यांना मयांक आणि सार्थक नावाची दोन मुले देखील आहेत.

710

आजच्या दिवशी मंजिरीने सोशल मीडियावर प्रसादसाठी खास पोस्ट करत लिहिलं आहे कि, 'प्रिय प्रसाद ..९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही दिवस “रणांगण” तापलं होतं...'

810

'पण हळू हळू "अशी बायको हवी" म्हणत तू “एकदा पहाव करून “ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही अस वाटणाऱ्या लोकांचा “भ्रमाचा भोपळा” फोडलास आणि शेवटी ही "साहेबजी डार्लिंग" झालीच. आणि "धन धना धन” असा आपला संसार सुरू झाला.'

910

'तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना “बोल बेबी बोल” म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच “मी बबन प्रामाणिक “ आहे . पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची “ सूत्रधार द बॉस “ आहे अर्थात्त तुला ती संधी मी “ आलटून पालटून “ देत होते . ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची “नांदी"???'

1010

'आपला पुण्याचा “वाडा चिरेबंदी “ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबर च्या अनेक सुख दुःखाची ही “ बेचकी” तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका “मग्न तळ्याकाठी ” च बसलीय असंच वाटतं . यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना “तू म्हणशील तसं" म्हणतच राहुयात.'

  • FIRST PUBLISHED :