बिग बॉस मराठी 4मधून समोर आलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
23 जुलै रोजी दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. साखरपुड्याटे थेट फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.
कोणताही मोठा तामझाम नाही, पाहुणे नाही, हॉल नाही अगदी घरच्या घरी प्रसाद आणि अमृता यांनी छोटेखाली साखरपुडा केला.
दोघांचे आई-वडील फक्त साखरपुड्याला उपस्थित होते. अमृता भाऊ अभिषेक देशमुख देखील बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावू शकला नाही.
अमृता प्रसाद 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नासाठी चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.