अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या स्मितहास्यामुळे, बोलण्याच्या शैलीमुळे आणि टॅलेंटमुळे चर्चेत असते.
'प्राजक्तराज'मधून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारी प्राजक्ता लेटेस्ट ट्रेंडही फॉलो करताना दिसतेय.
प्राजक्ता साडी प्रेमी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच साड्यांना लेटेस्ट टच देऊन त्यावर ट्रेंडी सिव्हलेस ब्लाऊज कॅरी प्राजक्तानं हटके फोटोशूट केलंय.
उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यात वॉर्म कलरच्या कलरफुल साड्यांमध्ये प्राजक्ताचं सौंदर्या चांगलंच खुलून आलं आहे.
अष्टनायिकांमधील प्रत्येक नायिकेची अवस्था प्राजक्ता तिच्या फोटोशूटमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असते.
या फोटोंतील हावभावातून प्राजक्तानं विरहोत्कठीता नायिका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात प्रियकराच्या विरहामुळे नायिकेच्या मनात काय चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.