महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खुच चर्चेत आहे.
नुकतीच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
प्राजक्ताने नुकताच तिच्या पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरु केला आहे.
प्राजक्तराज असं या ब्रँडचं नाव असून तो महाराष्ट्रात तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे.
या ब्रँड साठी प्राजक्ता मराठमोळ्या वेशात दागिने घालून फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
प्राजक्ताचे हे पारंपरिक वेशातील फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरताना दिसतात.
नुकतेच प्राजक्ताने असेच फोटो शेअर केले आहेत, पण त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.
तिने या सुंदर फोटोंमागचा किस्सा सांगितलं आहे. फोटो काढताना तिला फोटोग्राफरने 'आता इतर ज्वेलरी ब्रँडची जाहिरात नाही करणार का?' असं विचारलं आणि त्या प्रश्नानं प्राजक्ताला हसू फुटलं. तिचं निखळ हास्य पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.