अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच श्रीश्री रवीशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली.
आयूष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल, असं म्हणत प्राजक्तानं आश्रमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
आर्ट ऑफ लिविंगचा अडवान्स कोर्स करण्यासाठी गेलेल्या प्राजक्तानं नुकतंच तिचा कोर्स पूर्ण झाल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे तीन महिन्यातून एकदा काही गोष्टी करण्यासाठी ती आश्रमात जाते असंही तिनं सांगितलं.
"प्राणायम, योग, मेडिटेशन, म्युझिक, सात्विक लिविंग, सात्विक अन्न, पंचकर्म, निसर्ग आणि बरंच काही संयोजन या गोष्टी 3 महिन्यातून एकदा अनिवार्य आहेत", असं प्राजक्तानं म्हटलं आहे.
"जीवनात हे ज्ञान मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता ध्यानाशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही", असंही प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.