छोट्या पडद्याची सोज्वळ सून अशी ओळख असणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या लुक्समुळे साऱ्यांचचं लक्ष वेधते. पाहा तिचे लेटेस्ट फोटो.
दिव्यांका सुंदर गुलाबी रंगाच्या साडीत अगदी सुंदर दिसत आहे.
दिव्यांकाच्या या लुकवर अनेकांनी तिला 'महाराणी' अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
गुलाबी रंगाची साडी आणि लाॅंग स्लिव्ह ब्लाऊज यामध्ये दिव्यांका अगदी खुलून दिसत आहे.
मालिकेंप्रमाणेच दिव्यांका खऱ्या आयुष्यातही भारतीय कपड्यांना जास्त प्राधान्य देते.
तर तोकडे कपडे घालणार नसल्याचं तिने सांगितलं होतं त्यासाठी तिने काही चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्या होत्या.
दिव्यांका अनेकदा टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
नुकतीच ती खतरों के खिलाडी ११ साठी शुटींग करताना दिसली होती. तर बिग बॉसच्या पुढच्या सिझनमध्ये ती गेस्ट म्हणून दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.