NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Happy B'day Payal Rohatgi: प्रसिद्धी ते जेलवारी या कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या पायल रोहतगीचे खास किस्से

Happy B'day Payal Rohatgi: प्रसिद्धी ते जेलवारी या कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या पायल रोहतगीचे खास किस्से

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी आज म्हणजेच 9 नोव्हेंबरला आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ही अभिनेत्री अभिनयामुळे नाही तर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पायलने मॉडेलिंगच्या जगातही खूप नाव कमावले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पायल रोहतगी मिस इंडियामध्ये प्रियंका चोप्रासोबत सहभागी झाली होती. चला तर मग पायलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से.

19

अभिनेत्री पायल रोहतगीने '36 चायना टाउन', 'हे बेबी', 'फिर जिंदगी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु पायलला 'बिग बॉस सीझन 2' मधून विशेष ओळख मिळाली. पायल रोहतगीचा जन्म 9 नोव्हेंबर 1984 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे झाला.

29

पायल रोहतगीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिंगनंतर चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिचे वादांशी जुने नाते आहे.

39

2001 मध्ये पायल रोहतगीला मिस इंडिया टुरिझम आणि सुपर मॉडेल मिस टुरिझम वर्ल्डचा किताब मिळाला आहे. अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पायल रोहतगीने अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिरातही केली आहे.

49

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पायलने देखील प्रियंका चोप्रासोबत मिस इंडियामध्ये भाग घेतला होता, तरीही ती जिंकू शकली नाही.

59

मिस इंडियानंतर तिने मिस इंडिया टुरिझममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यातही तिने बाजी मारली.

69

पायलने 2002 मध्ये 'ये क्या हो रहा है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रोहतगीने चायना टाउन, प्लान, कॉर्पोरेट आणि दिल कबड्डी यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

79

लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर संग्रामची आयुष्यात एंट्री होण्यापूर्वी तिचे नाव राहुल महाजनसोबत जोडले गेले होते. 'बिग बॉस सीझन 2' या शो दरम्यान त्यांची ओळख झाली होती. पण राहुलने मानसिक शोषण आणि शारीरिक शोषण केले असा आरोप तिने त्यानंतर लावला होता.

89

दरम्यान 25 जून 2021 मध्ये पायलला एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. पण काही काळातच तिची सुटका झाली.

99

आता पायल रोहतगीने प्रदीर्घ नात्यानंतर आग्रा येथे कुस्तीपटू संग्राम सिंहसोबत लग्न केले आहे. पायल आणि संग्राम सिंग लग्नानंतर एकमेकांसोबत वेळ एन्जॉय करत आहेत. या जोडप्याचे लग्नाचे तसेच हनिमूनचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

  • FIRST PUBLISHED :