परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. रिपोर्टनुसार या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार असून त्यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाणही निश्चित केले आहे.
राघव आणि परिणीती यांनी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला. आता राजस्थानमध्ये दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे.
यासाठी त्यांनी एक आलिशान हॉटेल बुक केले आहे. अलीकडेच, हे जोडपे राजस्थानमध्ये स्काउटिंगच्या ठिकाणी स्पॉट झाले होते.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या लग्नासाठी द ओबेरॉय उदयविलास बुक केला आहे. हे हॉटेल उदयपूरच्या पिचोला तलावाच्या काठावर आहे.
ओबेरॉय उदयविलास, मेवाडच्या महाराजांचे हॉटेल आहे. हिरवीगार हिरवळ, मेवाड शैलीतील अंगण, कारंजे, स्विमिंग पूल अशा आलिशान राजवाड्यापेक्षा कमी नाही.
द ओबेरॉय उदयविलासच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्हाला येथे एका खोलीसाठी 35,000 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर येथील कोहिनूर सूटसाठी एका रात्रीचा खर्च 11 लाख रुपये आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,दोघेही पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत.
नुकतंच सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांनी जैसलमेरच्या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यानंतर आता परिणितीच्या लग्नाची देखील चर्चा सुरु झाली आहे.