सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दोघांच्या कुटुंबात चर्चा सुरू असून लवकरच साखरपुड्याची तारीखही निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पण त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना आहे. आज आम्ही तुम्हाला याविषयीच सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्टनुसार, परिणिती चोप्राने पंजाबमध्ये राघव चड्ढा यांची पहिली भेट घेतली होती. तेव्हा ती तिथे शूटिंग करत होती.
दोघे किती दिवस एकत्र आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही, पण फक्त ६ पहिल्यांपुर्वीपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे अशी माहिती समोर आली आहे.
परिणीती चोप्रा आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चढ्ढा या दोघांनी उघडपणे त्यांच्या नात्याचा खुलासा केला नसला तरी इंडस्ट्रीतील काही लोकांनी त्यांच्या लग्नाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या बातमीवर प्रसिद्ध अभिनेता-गायक हार्डी संधूने शिक्कामोर्तब केला आहे. हार्डी संधू हा परिणीती चोप्राचा चांगला मित्र आहे. त्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब करत तिला नव्या आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा या दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.