NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वैभव मांगले नंतर आता छोट्या पडद्यावर हा अभिनेता साकारणार स्त्री पात्र; फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक म्हणाले...

वैभव मांगले नंतर आता छोट्या पडद्यावर हा अभिनेता साकारणार स्त्री पात्र; फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक म्हणाले...

छोट्या पडद्यावर आजकल अनेक विविध प्रयोग होताना दिसत आहेत. अशीच एक वेगळ्या धाटणीची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहे. याआधी वैभव मांगले छोट्या पडद्यावर स्त्री भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेता अशी भूमिका साकारणार आहे. कोण आहे हा अभिनेता पाहा...

19

वैभव मांगले छोट्या पडद्यावर स्त्री भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेता अशी भूमिका साकारणार आहे.

29

अलीकडेच 'पांघरूण' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता म्हणजे अमोल बावडेकर.

39

या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. त्याच्या डोळ्यांमधली सात्विकता, त्याची शब्दफेक, भगवंताची भजनं गातानाची तल्लीनता ते सारं पाहाताना आपल्याही चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात.  अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती.

49

अमोल बावडेकरने आजपर्यंत सिनेमा, रंगभूमी आणि मालिका सगळ्याच माध्यमात अनेक विविधांगी भूमिका केल्या आहेत.

59

आता तो पुन्हा आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

69

सोनी मराठीवर लवकरच नवी मालिका 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची.....' ही नवी मालिका सुरु होणार आहे.

79

या मालिकेत अमोल स्त्री पात्राची भूमिका साकारणार आहे. एका तरुण मुलीच्या आईच्या भूमिकेत तो दिसणार आहे.

89

नुकतंच त्याने आपल्या सोशल मीडियावरून या मालिकेचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

99

अमोल बावडेकरचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले असून तर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

  • FIRST PUBLISHED :