पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल नायाब नदीम (Nayab Nadeem) हीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. नायाब नदीम (Nayab Nadeem) मर्डर केसमध्ये पोलिसांनी सांगीतलं आहे की त्यांनी संशयीत आरोपीला पकडलं आहे. तो अनेक दिवसांपासून नायाबचा पाठलाग करत होता. तर सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो तिच्या घराच्या आसपास भटकतानाही दिसला आहे.
29 वर्षीय मॉडेल नायब नदीम लाहौरच्या पॉश डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी फेज 5 मध्ये राहत होती. पोलिसांना संशय आहे की नायबची हत्या गळा दाबून करण्यात आली. सोमवारी तिचं पार्थिव कुटुंबियाकडे सोपवण्यात आलं.
पाकिस्तानी मीडिया वृत्तानुंसार नायब विनाकपडे मृत अवस्थेत सापडली होती. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नव्हता, तर ही हत्या बलात्कारातून झाल्याचं भासवण्यासाठी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी तिची कार ताब्यात घेतली असून तिच्या मोबाईलचा डेटाही तपासला जात आहे.
पोलिस तिच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहे. ज्यात तो संशयीत व्यक्ती घराच्या आजूबाजूला भटकताना दिसत आहे.
नायबचा भाऊ मोहम्मद अलीने सांगीतलं की 9 जुलै ला अर्ध्या रात्री तो बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता. त्याला ती मृतअवस्थेत सापडली. तिच्या मानेलाही जखम झाली होती.
अलीने सांगीतलं कि बाथरूमची खिडकी तुटलेली होती. ज्यातून संशय व्यक्त केला जात आहे की तो गुन्हेगार खिडकीतून गेला आणि आला असावा. अली नेहमी आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी जायचा.