पाकिस्तानच्या अनेक अभिनेत्री, गायक भारतीय कलाक्षेत्रातही नशीब आजमावायला उत्सुक असतात. पण सगळ्यांना त्यात यश येत नाही. काय आहेत कारणं?
माहिरा खान ने 2017 मधे रिलीज झालेला चित्रपट 'रईस' मधे शाहरुख खान सोबत बॉलीवूड मधे पदार्पण केलं होतं. माहिरा ने ने चित्रपटात आसिया ची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी शाहरूख सोबत माहिराच्या लूक आणि केमिस्ट्री ला पसंती दिली होती.
मावरा होकेन ने 2016 साली आलेला 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून हर्षवर्धन राणे सोबत बॉलीवूड मधे पदार्पण केलं होतं. चित्रपटात तिने सरस्वती पार्थसारथ उर्फ सरू चा रोल केला होता. हिरो सोबत तिटी ऑनस्क्रीन बॉन्डिंग प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
मीरा ने 2005 साली सोनी राझदानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट 'नजर' मधून डेब्यू केला होता. चित्रपटात अश्मित पटेल सोबत तिने काम केलं होतं. त्यानंतर मीरा ने लकी अली सोबत 'कसक' मधे काम केल होतं, जो एक थ्रिलर चित्रपट होता. 2012 मधे आलेला बोल्ड चित्रपट 'पांच घंटे मैं पांच करोड़' मधेही ती दिसली होती.
सबा कमर ने 2017 चा ब्लॉकबस्टर 'हिंदी मीडियम' चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खान सोबत बॉलीवूड मधे डेब्यू केला होता. चित्रपटात ती हिरोची पत्नी मीता बत्रा च्या रोल मधे दिसली होती. चित्रपटातील तिच्या कामाचं चांगलं कौतुकही झालं होतं.
साजल अली ने 2017 मधे आलेला चित्रपट मॉम मधे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी सोबत काम केल होत. त्यात तिने श्रीदेवी च्या मुलीचा रोल केला होता. चित्रपटात तिने एका बलात्कार पीड़ितेचा रोल केला होता.
अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांनी 80 ते 90 च्या दशकात बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांत अभिनय केला होता. 1982 साली आलेला 'निकाह' मधून त्यांनी बॉलीवूड मधे पदारपण केलं होत. यानंतर सलमा यांनी 'कसम पैदा करने वाले की', 'सलमा', 'ऊंचे लोग', 'जंगल की बेटी', 'पांच फौलादी', 'महावीरा', 'कंवरलाल', 'पति, पत्नी और तवायफ' अशा चित्रपटांत काम केलं.
झेबा बख्तियार यांनी 1991 चा चित्रपट 'हीना' मधून ऋषि कपूर यांच्यासोबत बॉलीवूड मधे डेब्यू केला होता. त्यानंतर 'मोहब्बत की आरजू', 'स्टंटमॅन', 'जय विक्रांत', 'मुकदमा', 'चीफ साहिब' या चित्रपटांत त्यांनी काम केलं.